मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती.
अनिल पराब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाल्याची माहिती शिवसनेच्या गोटातून समोर येत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.