झारखंड (वृत्तसंस्था) राज्यातील जमशेदपूर येथे एका तीन वर्षाच्या मुलीसोबत सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आरोपींनी आधी पिडीत मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. पिडीत मुलगी २६ जुलै पासून बेपत्ता होती.पोलिसांनी शोध मोहीम सुरु केल्यावर त्यांना मुलीच्या शरीराचे धड मिळाले होते. तर मुंडक्याचा शोध श्वान पथकाच्या मदतीने अद्यापही सुरु आहे.