जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मी देव नाही, पण देवाने मला रुग्णांच्या सेवेकरीता निवडले. यासाठी मी देवाचा सदैव ऋणी आहे, असे मनोगत असणारे गोदावरी समूहाचे सर्वेसर्वा डॉ. उल्हास पाटील.
न चुकता अगदी प्रभात काळी ५ वाजता प्रत्येक रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेतात व काळजीने त्यांच्या आरोग्याची विचारपूस करतात. हेतू हाच की आपल्या रुग्णालयातून एकही रुग्ण नाराज न होता अगदी आनंदाने रुग्णालयातून बाहेर पडला पाहिजे अथवा त्यांचे तब्येतीचे संपुर्ण समधान होऊनच घरी गेले पाहिजे.
एखादा व्यक्ती रुग्ण झाला, की तो स्वतः तर त्रासात असतोच. परंतु त्याचे पूर्ण कुटुंब त्या काळजीत असते की आता कसे होणार..? गोदावरी फाऊंडेशन अंतर्गत चालणारे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे एकमेव असे आहे. जेथे खानदेश तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथून रुग्ण येत असतात त्याची शस्त्रक्रिया, औषध उपचार मोफत उपलब्ध आहे. तसेच परिचर्या, डॉक्टर्स, सफाई कामगार यांच्या कामामध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी डॉ. उल्हास पाटील व त्याचे सोबत असलेले सशक्त सहकारी हे प्रतिदिवस न चुकता सर्वांची भेट घेतात. सर्व रुग्णालयात उल्हासदायी वातावरण निर्माण होऊन दिवसाची सुरुवात होत असते.