प्रतिनिधी (अमळनेर) येथील सदगुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्र आयोजित परिसरातील शेतकरी बांधवासाठी ‘सेंद्रीय शेती’ हा महत्वाच्या वर्गाला आजपासून सुरुवात झाली आहे. संस्थेमार्फत सदर कोर्स प्रथमच मुंबई बाहेर, अमळनेर येथे घेण्यात येत आहे.
प्रात्याक्षिक आणि माहिती रोज ताज्याभाज्या देणारी घरची परसबाग, माती परीक्षण, बीजसंस्कार पद्धती, कंपोस्ट पद्धती, हायड्रोपोनिक चारा, गांडूळ खत, अझोला जिवाणू खत, जीवाअमृत संप्रेरक, लमीन कीटकनाशक, सेंद्रिय बोर्डो पेस्ट, अशा अनेक विषयांची माहिती देण्यासाठी मुंबईहून पाच प्रशिक्षक येणार आहेत. चित्रफिती आणि प्रात्यक्षिक सादर केले जातील. कोर्स हा पुर्णपणे विनामूल्य असेल व वेळ सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत असणार आहे. आर के पटेल & कंपनी टोबॅको प्रोसेसिंग आर के नगर धुळे रोड, येथे सदर प्रशिक्षण आज उद्या (21 एप्रिल 2019) असा दोन दिवस असणार आहे. तरी जास्तीत जास्त श्रद्धावान शेतकरी बांधवांनी यांनी याचा लाभ घ्यावा व इतरांनाही घेण्यास सांगावे, असे आवाहन अनिरुद्ध उपासना ट्रस्ट अमळनेर यांनी केले आहे. दरम्यान, प्रवेश मर्यादित असल्यामुळे अधिक माहितीसाठी गोपालसिंह बागुल (मो.9270575777) व संदिपसिंह पाटिल (मो. 9765720080) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.