चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील मोहिदा येथील अनेर नदीपात्राच्या नांगरणीस प्रारंभ करण्यात आला असून यामुळे येथील पाणी टंचाईवर दिलासा मिळण्याची ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागाला दुष्काळाचा चटका बसत आहे. यामुळे सध्या भीषण पाणी टंचाईदेखील जाणवत आहे. चोपडा तालुक्यातील अनेक गावांनाही पाणी टंचाईचा फटका बसला आहे. यावर उपायोजना म्हणून तालुक्यातील मोहिदा येथील ग्रामस्थांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मोहिदाकरांनी गावाजवळून जाणार्या अनेर नदी पात्रामध्ये नांगरणी सुरू केली आहे. यामुळे पावसाळ्यात नदी पात्रात पाणी थांबून परिसरातील शेतीला लाभ होईल. तसेच यामुळे येथील पाणी टंचाईपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे सध्या ट्रॅक्टरच्या मदतीने नदी पात्राची नांगरणी सुरू करण्यात आली आहे.
पहा : मोहिदा ग्रामस्थांची नदी पात्रातील नांगरणी