Home क्राईम अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन महिलांना वाहनाने चिरडले

अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन महिलांना वाहनाने चिरडले


accident

पुणे (वृत्तसंस्था) मॉर्निंग वॉक करणाऱ्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील अहमदनगर-कल्याण महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

 

 

मीराबाई सुदाम ढमाले ( वय 60 ), कमल महादेव ढमाले ( 62 ), चांगुणा रामभाऊ रायकर ( 70 ) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलांची नावे आहेत. या तिन्ही वृद्ध महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. हॉटेल कुकडू कुक समोर आल्यावर अज्ञात अवजड वाहनाने काही कळायच्या आत त्यांना चिरडले. नागरिकांच्या मदतीने महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तीनही महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound