अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अमळनेर ते टाकरखेडा दरम्यानंच्या डाऊन रेल्वेलाईनवर घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर ते टाकरखेडा रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक २५४च्या २२ आणि २४च्या दरम्यान डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेबाबत लोकोपायटल यांनी अमळनेर स्टेशन मास्तर यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान मयताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.