धावत्या रेल्वेसमोर आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कजगाव दरम्यान धावत्या रेल्वेसमोर आल्याने अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेसमोर आल्याने एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. याप्रकरणी कामायानी एक्सप्रसेचे चालक प्रविण कुमार यांनी वाकीटाकीवरून माहिती दिली. त्यांनी भडगाव पोलीसात कळविण्यात आले. त्यानुसार कजगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाहेकॉ किशोर सोनवणे हे करीत आहे.

Protected Content