जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते भादली दरम्यानच्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी ६५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक असे की, जळगाव तालुक्यातील भादली ते भुसावळ रेल्वेच्या अप लाईनवरून जाणाऱ्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ६५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. याबाबत भादली रेल्वे स्टेशन मास्तर यांनी नशिराबाद पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल देशमुख हे करीत आहे.