किनगाव येथे विहिरीत कुजलेला अनोळखी मृतदेह आढळला

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील शिवारात एक विहिरीत ३५ वर्षीय वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी लिलाधार खंबायत यांच्या किनगाव शिवारातील विहिरीत एक २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरूणाचा विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस पाटील रेखा नायदे यांनी यावल पोलीसांना घटनेची माहिती दिली. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असून दुर्गंधी येत आहे. सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. वहिरीतून मृतदेह काढण्यात आला. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलीसांच्या माहितीनुसार १५ ते २० दिवसांपासून विहिरीत मृतदेह पडून असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.  

 

Protected Content