Home क्राईम वृध्द महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार

वृध्द महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार

0
122


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथे किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत वृध्द महिलेच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शांताबाई मंगल पवार (वय-६०) रा. हनुमंतखेडा ता.धरणगाव या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावात राहणारा सुकदेव गोपल सोनवणे हा तिथे आला. आणि दारूच्या नशेत माझी पत्नी तुमच्या घरात आहे का असे विचारले. त्यावरून वृध्द महिलेने माझ्या घरात नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने सुकदेव सोनवणे याने लोखंडी कोयता वृध्द महिलेच्या डोक्यात टाकून दुखापत केली.

त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारघेतल्यानंतर वृध्द महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता सुकदेव सोनवणे याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound