किरकोळ कारणावरून वृध्द महिलेला काठीने मारहाण

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील ६५ वर्षीय वृध्द महिलेला किरकोळ कारणावरून एकाने दारूच्या नशेत येवून लाकडी काठीने मारहाण करत दुखापत केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता वरणगाव पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे सुमनबाई केशव पाटील (वय-६५) या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावात राहणारा गोपाळ अरूण सोनवणे या तरूणाने दारूच्या नशेत येवून वृध्द महिलेला शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केली. यात वृध्द महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुमनबाई पाटील यांनी वरणगाव पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारा गोपाळ अरूण सोनवणे रा. जाडगाव ता.भुसावळ याच्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content