अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । बसस्थानक परिसरात ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा विश्वास संपादन करून हातातील २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम ची सोन्याची अंगठी अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती शुक्रवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बिलाखेड येथील दत्तू खंडू पाटील वय-८० हे ८ मार्च रोजी दुपारी बारा वाजता अमळनेर बसस्थानक परिसरात कामाच्या निमित्ताने आलेले होते. त्यावेळी त्यांना एक अज्ञात व्यक्ती भेटला, त्याने वृध्दाचा विश्वास संपादन करून हातातील २५ हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅमची अंगठी काढून चोरून नेत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची चौकशी केल्यानंतर अखेर शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार हे करीत आहे.