पाईपलाईन जोडण्यावरून वृध्दाला दोघांकडून बेदम मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातील शेतात वडीलोपार्जीत सामाईक शेतात पाईप जोडण्याच्या कारणावरून वयोवृध्दाला शिवीगाळ करत बांबुने डोळ्याजवळ मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सिताराम दोधा बारसे वय ७८ रा. हिंगोणे खुर्द ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याची वाघळी शिवारातील शेत गट क्रमांक ३९३ मध्ये वडीलोपार्जीत शेती आहे. या शेतात सामाईक पाईपलाईन लावण्यात आले आहे. २५ मे रोजी सकाळी १० वाजता शेतात सामाईक पाईप लाईन जोडण्यावरून सिताराम बोरसे यांना ज्ञानेश्वर पंडीत बोरसे आणि उशाबाई ज्ञानेश्वर बोरसे दोन्ही रा. हिंगोणे खुर्द ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करत जवळ पडलेला बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुरूवारी ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय शिंदे हे करीत आहे.

Protected Content