भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील खडका रोडवरील जाम मोहल्ला येथील घरासमोर पाणी फेकण्याच्या कारणावरून एका वृध्दाला लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवार २१ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. यापकरणी शनिवारी २२ जून रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहनवाज खान रशिद खान वय ६० हे वृध्द आपल्या परिवारासह जाम मोहल्ला परिसरात वास्तव्याला आहे. शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ११ वाजता घरासमोर पाणी फेकण्याच्या कारणावरून शेजारी राहणारे शेख जुनेद शेख शकील हे याने वृध्दाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसचे लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात टाकून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी २२ जून रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.