जामनेर प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील जामनेर पुरा भागात घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दिपक दामू कचरे (वय-४१) रा. जामनेर पुरा, जामनेर हा तरूण मजूरी करून उदरनिर्वाह करतो. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील विवेकानंद भागात त्याचा मित्र उल्हास नेमाडे सह चर्चा करत होते. त्याचवेळी अजय उर्फ अशोक वाल्मिक लोहार रा. विवेकानंद नगर, जामनेर हा आला. त्याने जुन्या वादातून दोघांना शिवीगाळ व मारहाण केली. या मारहाणीत दिपक कचरे याच्या हाताला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दिपक कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक लोहार याच्याविरोधात जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजेंद्र पगारे हे करीत आहे.