महागड्या सायकली चोरणारा सराईत चोरट्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातून लाखो रुपये किंमतीच्या महागड्या सायकली चोरणारा सराईत रेकॉर्डवरील चोरटा जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांची स्कॉट कंपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने दीड लाखाच्या महागडी सायकलबरोबर इतर सात चोरलेल्या सायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोउनि गोपाल देशमुख, प्रदीप बोरुडे, गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, इरफान मलिक, पोना विनोद सुर्यवंशी, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने केली.

Protected Content