जळगाव, प्रतिनिधी । नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टी महानगरची स्वतंत्र कोरोना योद्धा (वॉरियर्स) समिती स्थापन करण्याबाबत व्हर्च्युअल बैठकीत ठरविण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरची कोरोना महामारी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण व्हर्च्युअल(Zoom Meet) बैठक जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे व वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार व आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या होणारे हाल व दिशाभूल कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची होणारी हेळसांड नागरिकांची होणारी आर्थिक लूट यावर मात करण्याकरता भारतीय जनता पार्टीची कोरोना योद्धा म्हणून एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.
समितीत जळगाव शहर महानगरातील ९ मंडळाची मंडल निहाय २० कार्यकर्त्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये नागरिकांना लागणारी माहिती पुरवण्यात येणार आहे. यात कोरोना सेंटर त्यांचे नंबर, सेंटर्समध्ये उपलब्ध असणारे बेडची माहिती, ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे, रेमिडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्या संदर्भात, दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एखाद्या व्यक्तीची जर मृत्यू झाली तर त्याच्या करता स्मशानभूमी लागणारी मदत करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हा महानगरचे पदाधिकारी मंडल अध्यक्ष महानगर युवा मोर्चा व सर्व आघाडीचे अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते. या वर्च्युअल(Zoom Meet) मिटींगचे नियोजन जळगाव जिल्हा महानगरचे सोशल मीडियाचे अक्षय चौधरी यांनी केले असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले.