मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील बड्या आयएएस अधिकाऱ्याच्या एका मुलीने मंत्रालयासमोरील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. नेमके तिने हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे करण समजू शकले नाही. ही मुलगी एलएलबीचे शिक्षण घेत होती. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन तिने उडी मारून जीवन संपवले आहे.
लिपी रस्तोगी असे या मुलीचे नाव आहे, ती मंत्रालयासमोर सुनिती इमारतीत राहत होती. लिपीचे आईवडील दोघेही आयएएस अधिकारी आहेत. वडील विकास रस्तोगी हे सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर आई राधिका रस्तोगी या मुद्रा विभाग सचिव आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यामध्ये लिपी डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार लिपि रस्तोगी ही एलएलबीचे शिक्षण घेत होती. आज पहाटे ४ च्या सुमारास लिपि हिने कुटुंबियांसोबत राहत असलेल्या सुनीती या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारली, परिणामी तिचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील नागरिकांनी तातडीने लिपि हीला जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या या निर्णयामुळे तिचे आई वडील आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी तिने सुसाइड नोट लिहिल्याची माहिती आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. लिपिच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मित्र, कुटुंब व तिचे सहकारी यांना तिच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.