Home क्राईम नांद्रा येथील तलाठी नितिन पाटील यांच्याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल

नांद्रा येथील तलाठी नितिन पाटील यांच्याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल


indian clipart inspector 647287 8453274

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्रा येथील तलाठी नितिन किशोर पाटील यांच्याविरुद्ध लाचेची मागणी करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गुन्हा आज (दि.३० मे) दाखल करण्यात आला आहे.

 

नितीन पाटील यांच्याविरुद्ध जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन बक्षीस पत्राद्वारे आपल्या नावे करण्यासाठी तलाठ्याने त्याच्याकडे ७ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचांसमोर ४००० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच ती रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्नही केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी व गणेश कदम, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, सुरेश पाटील, पो.ना. मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पो.कॉ. प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी सापळा रचून ही कारवाई केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound