सुप्रिम कॉलनीतील तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विकास सुनिल नरसाळे त(वय-२६), रा. अमित कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विकास नरसाळे हा सुप्रिम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी सकाळी विकासचे मोठा भाऊ कामावर निघून गेला. वडील बाहेरगावी आणि आई बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्याचे पाहून विकास नरसाळे याने राहत्या घरात सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आई अनिलाबाई नरसाळे बँकेतून घरी आल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विकासच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content