धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळे गावात काहीही कारण नसतांना वृध्द दाम्पत्यासह नातवाला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी २ जून रोजी दुपारी २ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी दुपारी २ वाजता मारहाण करणाऱ्या ५ जणांविरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, सोमा धुलसिंग भिल हे वृध्द आपल्या पत्नी भारती सोमा भिल आणि नातू भावेश विजय भिल यांच्या सोबत वास्तव्याला आहे. रविवारी २ जून रोजी दुपारी २ वाजता काहीही कारण नसतांना गावात राहणारे धनराज गुलाब मालचे, सरला धनराज मालचे, पुनम धनराज मालचे, आशाबाई गुलाब मालचे आणि ज्योती धनराज मालचे यांनी सोमा भिल, त्यांची पत्नी भारती भिल आणि नातू भावेश भिल या तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच तिघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत भारती भील यांनी धरणगाव पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी ४ जून रोजी दुपारी २ वाजता धनराज गुलाब मालचे, सरला धनराज मालचे, पुनम धनराज मालचे, आशाबाई गुलाब मालचे आणि ज्योती धनराज मालचे सर्व रा. पिंपळे ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहे.