रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरामध्ये स्टेशन रोडवर एका अंडी विक्रेत्याच्या गाडीवर दारु पिऊन एकाने धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे वृत्त आहे. रात्रीच्या वेळी दारू पिऊन एका अंडी विक्रेत्याकडे हुज्जत घालतांना दिसत आहे. प्रकरण वाढत असल्याचे दिसताच तळीरामाच्या मदतीला त्याचा दूसरा सहकारी धाऊन आला आणि त्यानं प्रकरण मिटवलं असल्याचं सांगण्यात येत आहे..
अंडी विक्रेत्याच्या हात धुण्याच्या कारणामुळे हा वाद झाल्याचे समजते. यावेळी अंडी विक्रेत्याने देखील संबधिताचा व्हिडीओ करून पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा आग्रह धरला. मात्र सबंधित कर्मचारी याने घटनास्थळावरून धूम ठोकल्याने या प्रकारची चर्चा या परिसरात सुरु होती.