जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेत गट नंबर ४४ येथून २ बैल व १ गाय चोरून नेण्याचा प्रयत्न सोमवारी १३ मे रोजी रात्री १२.३० वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पहाटे ५ वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर शांताराम पाटील वय-४७, रा. धानवड ता. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेत गट नंबर ४४ मध्ये त्यांचे शेत आहे. त्या शेतात त्यांच्या मालकीचे २ बैल व १ गाय बांधण्यात आलेले होते. दरम्यान संशयित आरोपी मुस्ताक सय्यद हसन वय-४०, रा. अक्सा नगर, जळगाव आणि अरविंद अरुण वाघ वय-२५, रा. सुप्रीम कॉलनी या दोन जणांनी सोमवारी १३ मे रोजी रात्री १२.३० वाजता शेतकरी ईश्वर पाटील यांचे मालकीचे २ बैल व १ गाय चोरुन नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला. शेतकरी ईश्वर पाटील यांनी नशिराबाद पोलिसात अजून तक्रार दिली. त्यानुसार पहाटे ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुस्ताक सय्यद हसन आणि अरविंद अरुण वाघोदे या दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीश पाटील हे करीत आहे.