फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा

faijpur news

फैजपूर, प्रतिनिधी | येथील म्युनिसिपल हायस्कूल या विद्यालयातील १९८६ या सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा नुकताच येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ३५ वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्यानंतर सर्वांनी एकमेकांच्या परिवार, व्यवसाय व नोकरी बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी शिक्षकांनाही बोलावून सगळ्यांनी त्यांचे आशीर्वादही घेतले.

 

यावेळी सर्वानी एकत्र शिकत असतांना घडलेल्या आठवणींना उजाळा दिला. विविध भागातूनआलेल्या या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गुरुजनांनी दिलेली शिकवण तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही प्रगती करु शकलो, असे सांगितले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी सुख-दुःख शेअर करण्यासाठी जीवनात मित्रांची खूप गरज असते. मित्र परिवार आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा घटक असतो, असेही सगळ्यांनी स्पष्ट केले.

या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी नितीन राणे होते. यावेळी आजी,माजी,शिक्षक,यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या स्नेह संमेलनास विद्यालयाचे माजी शिक्षक बी.जे. चौधरी, एस.एन. नेहेते, पी.जे. राजपूत, पी.एम. मेश्राम, एन.एन. नारखेडे, पी.जे. चौधरी, सी.के. धांडे, पी.एन. चौधरी, ए.एन. चौधरी, ए.पी. भारंबे, सी.के. चौधरी हे शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक आर.एल. आगळे, पर्यवेक्षक एस.ओ. सराफ, शिक्षक बी.डी. महाले, राजपूत सर यांच्यासह म्युनिसिपल हायस्कूलचे शिक्षक व शिक्षेतर कर्मचारीही उपस्थित होते. सोहळ्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी मोलाची मदत केली.

Protected Content