जळगाव प्रतिनिधी । अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी उभी करुन कंपनीत कामाला गेलेल्या प्रौढाची १७ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. २३ मार्च रोजी दुपारी २.३० ते रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान, ही घटना घडली. आठ दिवसानंतर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बबनकुमार प्रल्हाद सोनी (वय ४३, रा. सदाशिवनगर) हे गाडेगाव येथील सुप्रिम कंपनीत सुरक्षा गार्ड म्हणून कामाला आहेत. गाडेगाव येथील कंपनीत जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १३ बीसी १०४३) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे २३ रोजी त्यांनी अजिंठा चौफुली परिसरात दुचाकी उभी केली होती. यांनतर बसने ते ड्युटीवर गेले. रात्री ११.३० वाजता परत आले असता त्यांची दुचाकी चोरीस गेल्याचे आढळुन आले. त्यांनी दुचाकी लावलेल्या ठिकाणाचा परिसर पिंजून काढला होता. दुचाकी मिळून आली नसल्याने त्यांनी २४ मार्च रोजी ऑनलाईन तक्रार केली होती. आठ दिवसानंतर आज ३१ मार्च रोजी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.