चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका ४१ वर्षीय व्यक्तीचा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना चोपडा शहरात घडली आहे. अरुण साहेबराव ठाकूर (वय ४१, रा. गुरुकुल नगर, चोपडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरुण ठाकूर हे नेहमीप्रमाणे ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तावसे फाटा घुमावल जवळील गोरेगाव रोडवर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना १४ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालविली. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.




