पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथील ४२ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथील वाल्मिक वामन पाटील (वय – ४२) हे दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मजुरांना मजुरी वाटप करायचे सांगून घरुन निघाले. दरम्यान नातेवाईकाच्या शेतात जावून त्यांनी विषारी औषध प्राशन करत जीवनयात्रा संपवली.
वाल्मिक पाटील हे चुंचाळे गावचे सरपंच होते. आर्थिक व्यवहारात अडकल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मयत वाल्मिक पाटील यांचे पाश्चात्य वडिल, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहिण असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे वाल्मिक पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.