चोपडा (प्रतिनिधी) येथील व्यापारी महामंडळाची मिटींग शनिवारी मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी अमृतराज सचदेव यांची तहयात अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी व्यापारी महामंडळाची पहीली पदाधिकारी व संचालक मंडळ तशी ठेवून नवीन कार्याध्यक्ष व संचालकांची निवड करण्यात आली. त्यानुसार कार्याध्यक्षपदी सुशीलभाई टाटीया व संचालक म्हणून नरेशभाऊ महाजन, राकेशभाई जैन, विवेकभाई पोतदार, चेतन टाटीया, सनी सचदेव, शेखरभाई जैन, नरेश सोनार, जय माधवाणी, तुषार पाटिल, मंयक बरडीया, नवल गुजर यांची निवड करण्यात आली. तर यावेळी भंवरलाल जैन, माणकलाल जैन, चंदुलाल पालीवाल, अमृतराज सचदेव, अनिल वानखेडे, नंदलाल अग्रवाल, सुनिल बरडीया, प्रवीण जैन,नरेंद्र तोतला, प्रफुल स्वामी, संजय श्रावगी, राजुभाई जैन, शाम परदेशी, नितीन अहीरराव, रमेश अग्रवाल, अनिल अग्रवाल, अक्रम तेली सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.