निवडणूकीत अमोल पाटलांचा विजय झाल्याने अमृत चौधरी वाटणार २१ हजार लाडू

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील शिवसेना शहराध्यक्ष अमृत चौधरी यांच्याकडून अमोल पाटील यांच्या आमदार पदी झाल्याबद्दल २१ हजार मोतीचूर चे लाडू वाटप करणार आहेत.

पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नाना गबा चौधरी यांचे मोठे चिरंजीव उद्योजक व पारोळा शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष अमृत नाना चौधरी यांच्याकडून अमोल चिमणराव पाटील यांना शहरातून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे पारोळा शहरातील घरोघरी मोतीचूर्चे लाडू वाटप करणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष अमृत चौधरी यांनी लाईव्ह ट्रेन न्यूजला माहिती दिली.

Protected Content