युवसेना महानगर प्रमुखपदी अमोल मोरे यांची निवड जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जळगांव जिल्हा युवासेनेची कार्यकारणी दैनिक सामना वृत्तपत्रातून जाहीर केली. या कार्यकारिणीत जळगाव येथील शिवसैनिक अमोल मोरे यांची जळगाव महानगर प्रमुख पदी (शहर अध्यक्ष)  नियुक्ती करण्यात आली

 

अमोल मोरे यांना शहराची जबाबदारी देण्यात आले आहे. श्री. मोरे  हे गेल्या ५ वर्षांपासून युवासेनाविभाग प्रमुख पदावर कार्यरत असून त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून विविध सार्वजनिक उपक्रम राबविले. तसेच अनेक आंदोलन, निवेदन, रास्तारोको करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली.  शिवसेनेत नुकत्याच झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई येथील शिवसेना भवनात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन युवासैनिक एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली. आगामी काळात युवासेनेचा शहरी तसेच शहरात विस्तृतपणे विस्तार करून शाखा तसेच शहरातील  विद्यार्थी हिताचे प्रश्न सोडणार आहेत.   “घर तिथे शिवसैनिक” हा उपक्रम राबवून संघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबत युवासेना युवाजिल्हाधिकारीपदी पियुष गांधी (जळगाव, अमळनेर, चाळीसगाव विधानसभा), निलेश चौधरी (जळगाव ग्रामीण, पारोळा, भडगाव आणि पाचोरा), जळगाव महानगर प्रमुखपदी यश सपकाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख अमित जगताप, उपजिल्हाधिकारी विशाल वाणी, कॉलेज कक्ष अधिकारी प्रीतम शिंदे, चिटणीस अंकित कासार यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. मोरे यांच्या  नियुक्ती बद्दल युवासेना सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख  विष्णु  भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे,  महपौर जयश्री महाजन, उपमहापौर कूलभूषण पाटील,  युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे,  किशोर भोंसले, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी यांनी अभिनंदन केले.

Protected Content