रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत धनंजय चौधरी यांना सलग पाच फेऱ्यापर्यंत धनंजय चौधरी हे आघाडीवर आहे. त्यावेळी अमोल जावळे हे मोठ्या फरकाने अमोल जावळे हे मागे होते. परंतू पाचव्या आणि सहाव्या फेरीत दमदार आघाडी घेत आता त्यांनी धनंजय चौधरी यांना पिछाडीवर टाकून लीड केले आहे. सहाव्या फेरी अखेरीस धनंजय चौधरी यांना २३ हजार ४१४ तर अमोल जावळे (भाजपा) यांना २५ हजार ४८५ इतकी मते मिळाल्याने आता खरी चुरस दिसून येत आहे.
रावेर विधानसभा निवडणुकीत यंदा बहुरंगी लढत झाली. भाजपच्या वतीने अमोल हरीभाऊ जावळे यांना आधीच तिकिट जाहीर झाले. तर काँग्रेसने धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी दिली. यासोबत, प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल छबीलदास चौधरी यांना तर वंचित बहुजन आघाडीने शमीभा पाटील यांना मैदानात उतरवले. निवडणुकीच्या प्रचारात मोठी चुरस दिसून आली. महायुतीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील व चित्रा वाघ यांच्या सभा झाल्या. काँग्रेसच्या वतीने देखील बाळासाहेब थोरात तसेच अन्य नेत्यांच्या सभा झाल्या. प्रहारच्या वतीने बच्चू कडू यांची तर वंचितच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभा पार पडल्या.
रावेर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठ्या प्रमाणात मतदान झाले. यात मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा ७३.८४ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने वाढलेली टक्केवारी ही नेमकी कुणाला लाभदायक ठरणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. याचे उत्तर मतमोजणीच्या दिवशी मिळणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमिवर, आज रावेर शहरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. धनंजय चौधरी (काँग्रेस) २३,४१४, अमोल जावळे (भाजपा) २५,४८५, अनिल चौधरी (प्रहार) ६,६७९, दारा मोहोम्मद (अपक्ष) १,५३५, शमिभा पाटील (वंचित) १५९१ अशी मते मिळाली आहे.