Home Cities यावल अमोल जावळे यांचा चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय

अमोल जावळे यांचा चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीने काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष मधूकर चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरींना उमेदवारी दिली.

रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे हे ४३ हजार ५६२ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. एकुण २४ फेऱ्यांमध्ये त्यांनी प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासह इतरांचा दणदणीत पराभव झाला आहे. यात प्रचाराच्या दरम्यान अमोल जावळे आणि धनंजय चौधरी यांच्याच जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये अमोल पाटील हे ४३ हजार ५६२ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे.

यात त्यांना १ लाख १३ हजार ६७६ मते मिळवून ते विजयी झाले आहे. तर धनंजय चौधरी यांना ७० हजार ११४ मते मिळाली दरम्यान, अमोल जावळे यांचा विजय झाल्याने पक्ष कार्यालयासह ठिकठिकाण कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचे दिसून आले.

 


Protected Content

Play sound