वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांशी अमोल जावळेंनी साधला संवाद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादळामुळे रावेर तालुक्यात हजारो हेक्टर वरील केळी भुईसपाट झाली असून शेतकरी चिंताग्रस्त असतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांची भेटी घेत नुकसानीमुळे खचून जाऊ नका शासना आपल्या सोबत असल्याचे. सांगत नुकसानीचे शासना कडून पंचनामे करण्यासंदर्भात आपण शासनस्तरावर बोललो असल्याचे त्यांनी शेतक-यांना सांगितले.

रावेर तालुक्यातील नेहते, दोधे, अटवाडे, खिरवड, अहिरवाडी गावांच्या परिसरात अवकाळी पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात आज भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केळी या भागातील प्रमुख पीक असलेल्या केळी बागांचे तसेच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यावेळी नुकसानग्रस्त नागरीक व शेतकऱ्यांशी भेट घेत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर दिला. शेतीपीकांचे झालेल्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी व नुकसाभरपाई मिळण्यासाठी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत, यात एकही बाधित सुटता कामा नये यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली.यावेळी त्यांच्या सोबत भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी धनगर समाजाचे युवानेते संदीप सावळे व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Protected Content