Home धर्म-समाज आमोदा-भीकनगाव हायवेला मिळणार स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव !

आमोदा-भीकनगाव हायवेला मिळणार स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव !

0
26


सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी खासदार व आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांनी साकारलेल्या आमोदा ते भीकनगाव या महामार्गाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे.

हरीभाऊ जावळे हे आमदार असतांना त्यांच्या प्रयत्नांनी आमोदा (ता. यावल) ते मध्यप्रदेशातील  भीकनगाव पर्यंतच्या महामार्गाचे काम मार्गी लावले होते. या हायवेचे काम पूर्ण झाले असून यामुळे पालमार्गे मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. दरम्यान, हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी हायवे पूर्ण झाला असला तरी त्यांचे अकाली निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात या हेतूने सावदा नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकाराने हा महामार्गाला हरीभाऊ यांचे नाव देण्यात यावे असा ठराव संमत करण्यात आला होता.

रामनवमीचे औचित्य साधून रविवार दिनांक १० रोजी आमोदा ते भीकनगाव या हायवेचे स्व. हरीभाऊ जावळे मार्ग असे नामकरण होणार आहे. या कार्यक्रमाला महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, भक्तीकिशारदासजी शास्त्री आणि महंत सुरेशबाबा मानेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सावदा विश्रामगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound