नवी दिल्ली , वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनातून बरं झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी हलका ताप आल्यानं शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वासोच्छवासातही अडथळा जाणवत होता. जवळपास १२ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
२ ऑगस्ट रोजी अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.
त्यानंतर ते आपल्या घरीच ‘आयसोलेशन’मध्ये होते. परंतु, पुन्हा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं अमित शहा यांना १८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.