धरणगाव (प्रतिनिधी) चोपड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेचे येथील उड्डाण पुलावर अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे पाच जण चिरडले गेले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर तिघांवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.
या संदर्भात अधिक असे की, आज सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका (क्र.एम.एच.१४ सी.एल.०७९१) हिचे धरणगावात शिरतांना उड्डाणपुलावरच ब्रेक फेल झाले. त्यामुळे समोर वाहनावरील व पादचारी यांना चिरडत ही रुग्णवाहिका शिवाजी महाराज पुतळ्या लगत असलेल्या डीव्हायडरला धकडली. तत्पूर्वी या रुग्णवाहिकेने पाच जणांना चिरडले. त्यात प्रवीण राजेंद्र शिंदे (वय १८) , रमेश नथ्थु चित्ते (वय ५०) हे दोन गंभीर असून त्यांना जळगाव रवाना करण्यात आले आहे. तर छगन आनंदा बोरसे (६७), भुपेंद्र गोकुळ पाटील (25) आणि एक अन्य अशा तिघांवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. दर्माय्न, या रुग्णवाहिकेने मारोती स्विफ्ट कार (क्र.एम.एच.१९ एक्स ५१२२) ला सुद्धा धडक दिली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.