चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रूग्ण हे दगावत आहे. या पाश्वभूमीवर चाळीसगाव येथील ट्रामा केअर सेंटरला लवकरच ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यात येणार असून मृत्यू दर कमी होणार आहे.
चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यात बेड व ऑक्सिजनच्या अभावामुळे असंख्य रूग्ण हे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मृत्यू दर आटोक्यात आणून रूग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी गुजरात अंबूजा एक्सपोर्ट ली. कंपनीने स्वत पुढाकार घेत येथील ट्रामा केअर सेंटरला ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ट्रामा केअर सेंटरला ऑक्सिजन निर्मिती युनिट हे कायमस्वरूपी बसवण्यात येणार आहे. ऑक्सिजन निर्मिती युनिटची क्षमता हि २१० लिटर दर मिनिटाला तयार होणार आहे. एकाच वेळी यातून ५० ते ६० रूग्णांना ऑक्सिजन मिळणार आहे. नियमितपणे ऑक्सिजनचा पुरवठा हे सुरळीत सुरू राहणार आहे. याआधीही कंपनीने ट्रामा केअर सेंटरला १० बेड, १० मेटरेस, १० आय सी यु मोनिटर, ४ स्वनिर्मित ऑक्सिजन मशीन वितरीत केले आहे. आज दि. २२ एप्रिल रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कंपनीच्या व्यवस्थापनाने बैठक पार पडली. ऑक्सिजन निर्मिती युनिट उभारण्यासाठी जागा बघून लवकरच कामाला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले.