पाच महिन्यांच्या कोरोनाकाळातही अंबानी यांना विक्रमी नफा

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पाच महिन्यापासून भारतीय उद्योजकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणली. कोरोना काळात सर्वांच्या नफ्यात आणि शेअरमध्ये घसरण होत असताना अंबानी यांनी विक्रमी नफा मिळवला. अंबानी यांनी या काळात कंपनीला कर्ज मुक्त देखील केले. जिओमध्ये फेसबुकपासून अनेक दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूक केली. आता अंबानी यांनी रिलायन्स रिटेलकडे फोकस केला आहे.

रिलायन्स जिओमधील काही हिस्सा विक्री केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलकडे लक्ष वळवले आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी किशोर बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुपमधील रिटेल व्यवसाय २४ हजार ७१३ कोटी रुपयांना विकला. आता अंबानी भारताचे नवे रिटेल किंग झाले आहे.

मुकेश अंबानी आता रिलायन्स रिटेलमधील काही हिस्सा विकणार आहेत. यासाठी एका अमेरिकन गुंतवणूकदाराशी चर्चा सुरू आहे. रिलायन्स आणि अमेरिकेन गुंतवणूकदार सिल्वर लेक यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजते.

याआधी सिल्वर लेकने रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. सिल्वर लेक रिलायन्स रिटेलमधील १.७ ते १.८ टक्के हिस्सा ७ हजार ५०० कोटींना विकत घेऊ शकते. रिलायन्स रिटेलची व्हॅल्यू ४.३ लाख कोटी इतकी आहे.

Protected Content