अमळनेर (प्रतिनिधी ) गुरुवर्य मोठे बाबा मंदिर श्रीरामनगर येथे काल ह.भ्.प अंबादास महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा पार पडली . हया सभेत अंबादास महाराजांच्या आठवणींना उजाळा मिळाला. हभप अंबादास चौधरी यांचे शिक्षकी पेशा सांभाळून अध्यात्मिक क्षेत्रात मोठे कार्य होते एक सच्चा उपक्रमशील शिक्षक ते एक चांगले कीर्तनकार उत्तर महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते त्यांचे लोकसभा निवडणुकीच्या चाळीसगाव येथील प्रशिक्षणात मृत्यू झाला त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असे माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील व साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी सांगितले.
यावेळी शांताराम पाटील, एल. जे. चौधरी, एस. एच. भवरे, व्ही. एन. न्हावी, सुनील अहिरराव, करंजेसर, उमेश काटे, संदीप घोरपडे, वाल्मिक मराठे, राजेंद्र पाटील, माजी तलाठी एस. एम. पाटील, हरिभाऊ मारवाडकर, माजी मुख्याधापक एस. एम. पाटील, हभप गोकुळ महाराज, यांनी शोकसंदेश दिला. याप्रसंगी वै. गुरुवर्य हभप विट्ठल भावडू चौधरी, स्मारक मंदीर वारकरी संस्था श्रीराम नगरीचे सर्व पदाधिकारी तसेच ढेकू रोड, पिंपळे रोड परिसरातील नागरिक, महीला, के. व्ही. पाटील मारवड, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसारे स्टाफ, मंदिराचे पुजारी सुकदेव चौधरी आदी उपस्थित होते. वै. गुरुवर्य मोठेबाबा मंदिराच्या सचिवपदी, अंबादास महाराज यांच्या पत्नी कमलाबाई यांचे नाव संचालक म्हणून जाहीर करण्यात आले. वै. गुरुवर्य मोठे बाबा संत निवासाला वै. हभप अंबादास चौधरी यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले. सुत्रसंचालन डी. डी. राजपूत यांनी केले. मोठे बाबाच्या सानिध्यात व ह.भ.प पोपट महाराजाच्या प्रेरणेने अंबादास महाराजांनी आपल्या वारकरी सेवेला प्रारंभ केला होता . त्यांचे अध्यात्मज्ञान प्रभावी होते .ते कळमसरे येथील शारदा माध्यमिक विदयालयात हाडाचे शिक्षक होते . याप्रसंगी अनेकांनी शोकसंदेश दिले . माजी जिप सदस्य शांताराम पाटील, एल .जी. चौधरी, व्ही . एन . न्हावी, संदिप घोरपडे, एस एच भवरे, उमेश काटे, अहिरराव सर,वाल्मिक मराठे,राजेंद्र पाटील, एस .एम.पाटील, हरिभाऊ मारवडकर, करंजेसर, यांनी भावुक स्वरात शब्द सुमने महाराजांच्या बद्दल वाहिली . सर्व भाविकांनी श्रध्दांजली अर्पण केली .सुत्रसंचालन श्री डी .डी. राजपुत यांनी केले .विविध भागातुन भाविक , बंधु भगिनी , अनेक पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते .