Home Cities अमळनेर अमळनेरात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक

अमळनेरात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक


crime bedya

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परीसरात अवैधरित्या विनापरवानगी गावठी बनावटीचा पिस्टल घेवून दहशत निर्माण करणाऱ्यास अमळनेर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेरात ऐण निवडणुकीत नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 4 रोजी सायंकाळी 18.40 वा.सुमारास अमळनेर बस स्थानक आवारात डेपो कडील बाजूस शहरात सार्वजनिक जागी एक इसम त्याच्या कबज्यात असलेल्या अवैध रित्या गावठी बनावटीचे पिस्टल ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती अमळनेर पोलीसांन मिळाल्यानंतर घटनास्थळी जावून संशयित आरोपी प्रकाश सदाशिव सुर्यवंशी वय-52 रा.बंगाली फाईल याला अटक करून त्याच्या ताब्यातील 25 हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्टल व हजार रूपये किंमतीचे एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात संशयित आरोपी प्रकाश सुर्यवंशी यांच्या विरोधात आर्म ॲक्टचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे.

यांनी केली कारवाई
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोउनि राहुल लबडे, पो.ना. ईश्वर सोनवणे, पोना मिलींद भामरे, पोना शरद पाटील, पोना किशोर पाटील, पोना दीपक माळी, पोना भेटुसिह तोमर, पोकॉ रविंद्र पाटील, पोकॉ योगेश महाजन, पोकॉ योगेश बागुल व पोकॉ हितेश यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound