Home Cities अमळनेर अमळनेरातील मंदिरातून चोरट्यांनी लांबविला ऐवज

अमळनेरातील मंदिरातून चोरट्यांनी लांबविला ऐवज

0
33

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वर्णेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे छत्र असा एकूण ३० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय गोविंदा शुक्ल (वय-७१) रा. ब्रह्मे गल्ली, अमळनेर हे मंदिरात विश्वस्त म्हणून काम पाहतात. अमळनेर शहरातील वर्णेश्वर मंदिरात २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपासून ते २८ फेब्रुवारी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत ३०० रुपयांची रोकड आणि ३० हजार रुपये किमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे धातूचे छत्र असा एकूण ३० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्वस्त संजय शुक्ला यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound