अमळनेर प्रतिनिधी । शहरातील मुंदडा नगर भागात गजानन महाराज मंदिरासमोर बंद घरफोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह चांदीचे मूर्ती असा एकुण २८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा शरद पाटील (वय-२४) रा. मुंदडा नगर गजानन महाराज मंदिरासमोर अमळनेर या आपल्या कुटुंबियांसह राहतात. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता दरम्यान त्या घर बंद करून कामाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे गेलेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद फोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले. २५ हजार रुपयांची रोकड आणि ३ हजार रुपये किंमतीचे ५ भार चांदीची लक्ष्मी मूर्ती चोरून नेली. याप्रकरणी वर्षा पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र ठाकरे करीत आहे.