अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नगाव खुर्द येथे आज सायंकाळी वीज कोसळून एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
तालुक्यातील नगाव खुर्द येथे आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने एका तरूणीचा बळी घेतला.नगाव खुर्द यथील निरगली मुका बारेला ( वय १७ वर्षे ) ही युवती नगाव खुर्द शिवारातून कामावरून परत येत असतांना अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला आहे.
परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र अवकाळी पावसाच वातावरण दिसून येत आहे अशातच आज सायंकाळी नगाव खुर्द शिवारातुन मजूर युवती घराकडे पाचारण करीत असतानाच निसर्गाने झडप घातल्याने तिला जीवाशी मुकावे लागले आहे. ही घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, मयत निरगली बारेला हिच्या मृत्यू प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.