अमळनेर येथे ८ टन कचरा संकलित

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात नुकतीच स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून या अभियानात ८ टन कचरा संकलित करण्यात आला आहे.

डाॅ. श्री नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा तर्फे स्वच्छतादूत तथा पदमश्री पुरस्कार प्राप्त डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन डाॅ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी तब्बल १३० श्री सस्दय सहभागी झाले होते. त्यांनी आठ टन कचरा संकलीत केला.अमळनेर येथील ईदगाॅह कब्रस्थान येथुन ४टन तर समस्शानभूमी पैलाड येथुन ४ टन कचरा संकलीत करुन डम्पींग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावण्यात आला.

याप्रसंगी स्वच्छता अभियानाला आमदार अनिल भाईदास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे व प्रभारी प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी भेट दिली.

दरवर्षी सदस्यांच्या स्तुत्य उपक्रम — दरवर्षी राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम राबवीण्यात येते. आतापर्यंत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वछता मोहीम या उपक्रमानी सर्वत्र श्री सदस्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, समाजोपयोगी उपक्रम यांनी नेहमी सहभाग दिसून येतो.

Protected Content