धानोरा-भोरटेक ग्रामपंचायतीतर्फे बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील धानोरा-भोरटेक ग्रामपंचायतीतर्फे बिहार पॅटर्नच्या अंतर्गत साडे सोळा हजार वृक्षांची लागवड करण्यात येत असून याचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, अमळनेर तालुक्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम जोर धरू लागली आहे.यात धानोरा भोरटेक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेत यावर्षी साडे सोळा हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उपक्रमाची सुरवात जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.दुष्काळामुळे वृक्षलागवड काळाची गरज झाली असून त्यांना जतन करण हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं प्रतिपादन जयश्री पाटील यांनी केलं.

यावेळी सरपंच दिलीप हिरालाल ठाकरे, उपसरपंच अमोल दिलीपसिंग राजपूत, ग्राम रोजगार सेवक संदीप सुभाष राजपूत,ग्रामसेवक नितीन भूपेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाटील, सुनील भिल,नाना भिल,अशोक कडरे, मनोज राजपूत, बन्सीलाल राजपूत, किशोर परदेशी, प्रवीण राजपूत, आकाश कोळी, योगेश राजपूत, कैलास परदेशी अमृत राजपूत,संग्राम परदेशी, संदीप राजपूत,मोहन धनगर,नंदू उत्तम राजपूत, ईश्वर परदेशी,पप्पू धनगर, छबिलाल भिल, हिरामण भिल, अण्णा कडरे,बापुजी नारायण, जय राम भिल,मुकुंदा भिल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content