Home Cities अमळनेर अमळनेरच्या तहसीलदारांनी पकडले वाळू तस्करी करणारे डंपर

अमळनेरच्या तहसीलदारांनी पकडले वाळू तस्करी करणारे डंपर

0
51

अमळनेर प्रतिनिधी । येथील अमळनेर नुतन तहसीलदार ज्योती देवरे यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरला पकडले असून वाहक मात्र पळून गेला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, अमळनेर तहसील कार्यालयात नुतन तहसीलदार ज्योती देवरे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. यानंतर रात्री दोन वाजता अनाधिकृत रेतीचे डंपर रेती वाहत असल्याची कुणकुण लागली. यानुसार त्यांनी जळोद येथे अनाधिकृत रेतीचे डंपर रात्री दोन वाजता पकडले. यावेळी चालक पळून गेला. संबंधीत डंपर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून याला नंबरची प्लेट नसल्याचे दिसून आले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कारवाई मुळे अनाधिकृत रेती वाहतुक करणार्‍याना चांगला धडा मिळेल अशी चर्चा सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound