अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिवाळीच्या चार दिवसात अमळनेर आगाराने सवलत मुल्यासह सुमारे १९ लाख ३० हजार ५२० रु इतके उत्पन्न कमावले असून.यामुळे,अमळनेर आगाराला दिवाळी चांगलीच पावली असल्याचं सांगितले जाते आहे.
-दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ असताना देखील गेल्या आठवढा भरापासून एसटीने प्रवास करणार्यांची संख्या कमालीची वाढताना दिसून आली.परिणामी अवघ्या चार दिवसात आगाराला १९ लाख रूपये मिळाले आहे. याचे श्रेय अमळनेर एसटी विभागातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना जात असल्याची माहिती आगार व्यवस्थापक इम्रानखान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी,रा. प.म.जळगांवचे विभागीय वाहतूक अधीक्षक किशोर महाजन यांनी एसटी कर्मचारी यांचा उत्साह वाढावा म्हणून एसटीचे चालक व वाहक यांचा गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी डेपो मॅनेजर पठाण,प्रमोद बाविस्कर,अनिकेत हनायदे अमोल पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान दिवाळीत आठवडाभर एसटीची संपूर्ण राज्यभर हंगामी भाडेवाढ असतांना देखील प्रवाशी बांधवांनी लालपरीने प्रवास करण्यास पसंती दिली आहे. आणि यामुळेच अमळनेर आगाराने प्रवाशी वर्गाचे आभार मानले आहेत.