
अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत सखाराम महाराज संस्थांनचा पालखी सोहळा पौर्णिमेला रविवार दि 19 मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प.पु. संत प्रसाद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिलीय.
यात्रोत्सवात दरवर्षी पौर्णिमेला पालखी सोहळा होत असला तरी यंदा दि 18 व 19 दोन दिवस पौर्णिमा असल्याने काहीं भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु प्रसाद महाराजांनी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, दरवर्षी परंपरेनुसार रथोत्सवापासून पाचव्या दिवशीच पालखी सोहळा होत असतो. यामुळे यंदाही त्यानुसारच रविवार दि 19 मे रोजी पालखी सोहळा होणार असून सकाळी 6 वा वाडी संस्थानातुन पालखी सोहळ्यास सुरूवात होणार आहे. तरी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प पु संत प्रसाद महाराज यांनी केले आहे.