अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणार्या पाडळसरे धरणासाठी १३५ कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून यासाठी आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा फलदायी ठरला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
सोमवारी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील पाडळसरे धरणासाठी १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर येथील प्रशासकीय इमारतीसाठीही १४ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली. तसेच अमळनेरात प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी १४ कोटी १७ लाखांची तरतूद केली आहे.
निधीअभावी पाडळसरे धरणाचे काम बंद पडले असतांना तब्बल १३५ कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे या धरणाचे काम मार्गी लागण्याची शक्यता आता बळावली आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे निधी मिळाल्याचे दिसून येत आहे.